अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सिलवेनिया राज्यातील बटलर शहरात एका प्रचारसभेत गोळीबार करण्यात आला. ही घटना 13 जुलै या दिवशी संध्याकाळी घडली. हल्ला करणाऱ्या व्यक्तीला सिक्रेट सर्विस च्या अधिकाऱ्यांनी ठार केले असून डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत. डोनाल्ड ट्रम्प एका प्रचार सभेत भाषण करत असताना गोळीबार झाला. त्यानंतर ट्रम्प कानाला हात लावत खाली झुकले. काही क्षणात सिक्रेट सर्विसेस अधिकाऱ्यांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवत घटनास्थळापासून दूर घेऊन गेले. अशा परिस्थितीत त्यांनी उपस्थित लोकांकडे पाहून अभिवादन केले.