मायक्रोसॉफ्टच्या सर्वर मध्ये अडचण आल्यामुळे जगभरात सर्व ऑनलाईन माध्यमांना मोठा फटका बसला.
शुक्रवारी जगभरातील संपूर्ण एअरलाइन्स,बँका, सोशल मीडिया बंद पडले.

आयटी चा वापर करणाऱ्या सर्व सेवांना याचा फटका बसलेला आहे. सर्वात मोठा फटका एअरलाइन्स कंपन्यांना बसलेला आहे.अनेक हवाई वाहतूक बंद पडल्या आहेत.

भारतामध्ये दिल्ली विमानतळावर एअर इंडिया, स्पाइसजेट , इंडिगो, आकासा या एअरलाइन्स कंपन्यांना बराच फटका बसलेला आहे. तसेच प्रवासीही नाराज झालेले आहेत.

म्हणून दिल्ली एअरपोर्टन ‘जागतिक आयटी समस्या आहे’ असे ट्विट केले आहे. तर विमानतळावर याच कारणामुळे मोठा गोंधळ उडालेला आहे.

दिल्ली विमानतळाने असे म्हटले आहे की दिल्ली विमानतळ त्यांच्या सर्व पार्टनरशी संपर्कात आहेत जे पार्टनर्स प्रवाश्यांशी कनेक्टेड आहेत त्या प्रवाश्यांना कमीत कमी त्रास व्हावा हा प्रयत्न दिल्ली विमानतळाचा चालू आहे. या प्रयत्नांवर दिल्ली विमानतळाचे पार्टनर्स विमानतळाना लागेल ती मदत करत आहेत. त्या प्रयत्नामुळे प्रवाशांचा थोडाच त्रास वाचलेला आहे.

दिल्ली विमातळावर हाताने लिहिले विमानाचे टाईम!

आयटी सॉ्टवेअर मध्ये समस्या आल्या मुळे दिल्ली विमानतळाच्या स्टाफ ने विमानाची वेळ हाताने लिहिली. विमानतळावरील लोकांच्या लांबच लांब रांगानं मुळे प्रवाशांशी स्टाफला थेट संपर्क साधता येत नव्हता.

“आमच्या सिस्टीमवर चालू असलेल्या समस्येचा परिणाम होत असल्याने संपर्क केंद्रावर तुमचा प्रवास 24 तासांच्या आत मोठ्या प्रमाणात होत आहे.तसेच “आमच्या सिस्टमवर सध्या मायक्रोसॉफ्टच्या आउटेजचा परिणाम झाला आहे, ज्याचा इतर कंपन्यांवरही परिणाम होत आहे. या वेळी बुकिंग करताना, चेक इन करा, तुमच्या बोर्डिंग पासवर, आणि काही फ्लाइट्सवर परिणाम होऊ शकतो. आम्ही तुमच्या संयमाची प्रशंसा करतो.”असे इंडिगो चे म्हणणे आहे.

सकाळ पासूनची स्तिती पहाचय प्रवाशांचे योग्य नियोजन करावे हे एअर इंडियाचे म्हणणे आहे.

स्पाईस जेटनेही या संकटाबद्दल ट्वीट केलं आहे की, विमानांची माहिती अपडेट करण्यात त्रास होत आहे आणि त्यांची टीम ही अडचण सोडवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत आहे.

ऑस्ट्रेलियातील सिडनी या विमानतळाची उड्डाण थांबलेली आहे.तसंच युनायटेड एअरनाइन्सनंही उड्डाणं थांबवल्याचं पाहायला मिळालं. लंडन स्टॉक एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मलाही याचा फटका बसला. लंडनमध्ये स्टॉक एक्सचेंज मार्केट ही बंद झालेला आहे . त्यामुळे तेथील स्टॉक एक्सचेंज मार्केट ला त्याचा मोठा फटका बसलेला आहे.

मायक्रोसॉफ्ट वाल्यांचाही असं म्हणणं आहे की त्यांना गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून ही समस्या जाणवत आहे. नेमकी काय झालं आहे याचा आम्ही शोध घेत आहोत. असं ते म्हणत आहेत. परंतु त्यातून अध्यापर्यंत काही मार्ग निघालेला नाही.

रेल्वेनाही याचा मोठा फटका बसलेला आहे.

युके मधील एका सर्वात मोठ्या रेल्वे कंपनीला याचा फटका बसलेला आहे कारण प्रवाशांचे तिकीट ऑनलाइन बुक होत नाही. त्यामुळे तेथील रेल्वे कंपनीलाही आयटीच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. तेथील सेवांवर ही या गोष्टीचा परिणाम होण्याचा इशारा दिलेला आहे.

ब्रिटन मधील स्काय न्यूज चॅनलाही या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. स्काय न्यूज चे अधिकारी मोठे चिंतित आहेत. कारण त्यांना आजच्या लाईव्ह ब्रॉडकास करता आल नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

गोविया थेम्सलिंक रेल्वेच्या थेम्सलिंक, गॅटविक एक्सप्रेस ,सदर्न आणि ग्रेट नॉर्दर्न या चारही रेल्वे ब्रँडनं सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
“आमच्या नेटवर्कमध्ये आयटी च्या व्यापक समस्यांना याचा मोठा सामना करावा लागत आहे .नेमक काय झालं आहे याचा शोध आम्ही घेतच आहोत “असं त्यांनी म्हटलेलं आहे.

स्पेन मध्येही विमानतळाना या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. बर्लिन विमानतळावर ही या अडचणी मुळे चेक इन मध्ये समस्या येत असल्याचे त्यांनी एका पोस्ट मधून सांगितले आहे.

अमेरिकेच्या अलास्का देशामध्ये आपत्कालीन फोन सेवांवरही याचा परिणाम झाला आहे.

फेसबुक वर आलास्का च्या पोलिसांनी याबाबत माहिती पोस्ट केलेली आहे.संपूर्ण राज्यामध्ये फोन सेवा बंद झालेली आहे असे त्यांनी म्हांटलेल आहे .