काठमांडू विमान अपघातात 18 जणांचा मृत्यू, नेपाळमध्ये गेल्या 10 वर्षांत किती विमान अपघात झाले आहेत ?
नेपाळच्या काठमांडू विमानतळावर बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह सापडले आहेत.
नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली आहे.
विमानाच्या पायलटला सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमानात एकूण १९ जण होते. १९ जनातून फक्त 1 जण वाचले.
सौरी एअरलाइन्स कंपनीचे हे विमान सकाळी 11.15 वाजता काठमांडूहून पोखराच्या दिशेने उड्डाण करत असताना त्रिभुवन विमानतळावर हा अपघात झाला.
नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात अनेकांचे मृतदेह सापडले आहेत.
नेपाळी पोलिसांचे प्रवक्ते दान बहादूर कार्की यांनी सांगितले की – आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पाच जणांच्या मृतदेहांचा आध्याप पर्यंत शोध घेत आहोत.
सौरी एअरलाइन्सच्या या विमानात कंपनीचे १७ कर्मचारी आणि क्रू मेंबर्स होते.
काठमांडू पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले – विमान अपघाताची माहिती सकाळी 11.15 वाजता मिळाली. बातमी मिळाल्यावर लगेच पोलीस घटना स्तलावर पोहचले.
अपघातानंतर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. नेपाळी लष्करानेही बचावकार्यासाठी आपली टीम विमानतळावर तैनात केली आहे.
घटना स्तलावर पोहचल्यावर जळत्या विमानातून पायलटला बाहेर काढण्यात आले.
व ताबतोब पायलटला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका एअरलाइन कंपनीच्या अधिकाऱ्याने नेपाळी सेवेला सांगितले – विमानाची देखभाल सुरू होती.
काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर पोखरासाठी टेकऑफ दरम्यान विमानाचा अपघात झाला.
विमानतळ प्रमुख जगन्नाथ निरौला यांनी सांगितले की, “विमानाने उड्डाण करताच ते उजवीकडे वळले त्या विमानाला खर तर डावीकडे वळायचे होते. संपूर्ण तपासानंतर अपघाताचे कारण समजेल. टेकऑफच्या काही मिनिटातच हा अपघात झाला.
सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या फोटोंमध्ये विमानतळाच्या धावपट्टीवरील ढिगाऱ्यातून धूर निघताना दिसत आहेत.
सौर्य एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, विमानात कंपनीचे १९ कर्मचारी होते. यामध्ये क्रू मेंबर्सचाही सहभाग होता.
सध्या विमानात बसलेल्या लोकांची माहिती उपलब्ध नाही. ती माहिती आम्ही लवकरात लवकर शोधून काढू असे पोलिसांचे म्हणने आहे.
नेपाळमध्ये गेल्या 10 वर्षांत विमान दुर्घटना भरपूर झाल्या .
कोणत्या वर्षी किती विमान आपघात झाले ते बघुया ?
जानेवारी २०२३: पोखरा विमानतळावर यती एअरलाइन्सचे विमान कोसळले, विमानातील सर्व मनुष्यानं पैकी ७२ जण ठार झाले.
मे 2022: पोखरा ते जोमसोमला जाणाऱ्या विमानाच्या अपघातात, 22 जण ठार झाले.
एप्रिल 2019: लकला विमानतळाजवळ विमानाची दोन हेलिकॉप्टरला टक्कर झाली त्यात, तीन जणांचा मृत्यू झाला.
फेब्रुवारी 2019: ताप्लेजुंगजवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये पर्यटन आणि नागरी उड्डाण मंत्री रवींद्र अधिकारी यांचाही समावेश होता.
सप्टेंबर 2018: गोरखाहून काठमांडूच्या दिशेने येत असलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, यात जपानी नागरिकासह पाच जणांचा मृत्यू झाला.
मार्च 2018: बांगलादेशहून नेपाळला येत असलेल्या विमानाचा त्रिभुवन विमानतळावर अपघात झाला, त्यात 51 जणांचा मृत्यू झाला.
फेब्रुवारी २०१६: पोखरा ते जोमसनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला , त्या आपघात २३ जणांचा मृत्यू झाला.
मे 2015: भूकंपग्रस्त भागात काम करणाऱ्या अमेरिकन हेलिकॉप्टरचा चारीकोटजवळ अपघात झाला, त्यात सहा अमेरिकन सैनिक, दोन नेपाळी अधिकारी आणि पाच नागरिकांचा मृत्यू झाला.