साल होतं २०१२, ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या होत्या, निकलही लागला होता आणि आता प्रतीक्षा होती ती महापौर निवडणुकीची पण शिवसेनेला मिळाल्या होत्या ५२ जागा आणि बहुमताचा आकडा होता ६१.
त्यावेळी राज्यात सरकार होतं राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचं अशाच मध्ये राज आणि उद्धव यांचे संबंध अगदी टोकाचे होते त्यामुळे राज हे आघाडी सरकार असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांना पाठिंबा देण्याची शक्यता होती.
त्याच काळामध्ये नौपाड्यामधील भाजपाच्या एक नगरसेविका गायब झाल्या होत्या. त्यामुळे युतीमध्येही फूट पडली होती. म्हणूनच राज ठाकरेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
पण , ठाण्याची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे यांनी लगेच राज ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याची मागणी केली आणि दिलदार राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने एकनाथ शिंदे यांना टाळी दिली आणि ठाणे महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आली आणि शिवसेनेने मनसेच्या पाठिंब्यावर आपला महापौर केला.