Dainik Sahyadri

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीपाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपनं जोरदार मुसंडी मारली.

Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीपाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपनं जोरदार मुसंडी मारली. मुंबईसह राज्यातील तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजपनं विजयी घोडदौड कायम ठेवली. सर्वात धक्कादायक म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबईत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावलीय. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं. मुंबईची निवडणूक यंदा सर्वार्थानं वेगळी होती. तब्बल 20 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येत निवडणूक लढवली. ठाकरे बंधूंना 71 जागी यश मिळालंय. तर पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही अजित पवारांना मोठा धक्का देत भाजपनं एकहाती सत्तेचा सोपान गाठलाय. तर नागपूरमध्येही भाजपनं आपला गड अबाधित ठेवलाय. त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देत सत्ता खेचून आणली. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 52.94 टक्के, ठाणे मनपात 56 टक्के, पुणे मनपात 52 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 58 टक्के, नवी मुंबईत 57 टक्के, नाशिक मनपात 57 टक्के मतदान झालंय. परभणीत 66 टक्के, जालन्यात 61 टक्के मतदान झालंय. त्यामुळे 29 महापालिकेत कोणाची सत्ता, कोणाचा महापौर होणार?, हे जाणून घ्या.

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचे निकाल – टेबल स्वरूपात

क्र.महानगरपालिकेचे नावएकूण जागासत्ताधारी पक्ष / आघाडी
1बृहन्मुंबई227भाजप – शिंदे गट
2भिवंडी-निजामपूर90काँग्रेस
3नागपूर151भाजप
4पुणे165भाजप
5ठाणे131शिवसेना (शिंदे) – भाजप
6अहिल्यानगर68भाजप – राष्ट्रवादी
7नाशिक122भाजप
8पिंपरी-चिंचवड128भाजप
9छत्रपती संभाजीनगर115भाजप
10वसई-विरार115बहुजन विकास आघाडी
11कल्याण-डोंबिवली122भाजप – शिंदे गट
12नवी मुंबई111भाजप
13अकोला80भाजप
14अमरावती87भाजप – राष्ट्रवादी
15लातूर70काँग्रेस – वंचित
16नांदेड-वाघाळा81भाजप
17मीरा-भाईंदर96भाजप
18उल्हासनगर78इस्लाम पार्टी – एमआयएम
19चंद्रपूर66काँग्रेस
20धुळे74भाजप
21जळगाव75भाजप
22मालेगाव84इस्लाम पार्टी
23कोल्हापूर92महायुती
24सांगली-मिरज-कुपवाड78महायुती
25सोलापूर113भाजप
26इचलकरंजी76भाजप
27जालना65भाजप
28पनवेल78भाजप
29परभणी65ठाकरे गट – काँग्रेस

Exit mobile version