India Vs Australia T20 हायलाइट्स: आज मोहाली येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक सामन्यात भारतावर चार विकेट्सने मात करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २०८  धावा केल्या. हार्दिक पंड्याने तुफानी खेळी खेळताना ३०  चेंडूत नाबाद ७१  धावा केल्या. सलामीवीर केएल राहुलनेही अर्धशतक झळकावले आहे. सूर्यकुमार यादवने ४६  धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयसीसी टी-२० विश्वचषकापूर्वी भारत ही मालिका सराव म्हणून घेईल आणि आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करेल.

ऑस्ट्रेलियाने भारताचा चार गडी राखून पराभव केला
मोहालीत आज झालेल्या पहिल्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा चार गडी राखून पराभव केला. हार्दिक पांड्याची नाबाद ७१ धावांची खेळी व्यर्थ गेली. प्रथम फलंदाजी करताना भारताने २०८  धावांची मजबूत धावसंख्या उभारली. पण ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ पाहिला आणि सुरुवातीच्या षटकांमध्ये अतिशय वेगवान धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला आपले कौशल्य दाखवता आले नाही. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे.