Ind Vs Aus 2nd T20 -२०२२ : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८षटकांत ९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४ चेंडू राखून ६ विकेट्स राखून सामना जिंकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ४६ धावा केल्या. ९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीच्या षटकात अनेक षटकार ठोकत संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारताची पहिली विकेट तिसऱ्या षटकात केएल राहुलच्या रूपाने आली. राहुल ६ चेंडूत १० धावा करून बाद झाला. विराट कोहली ६ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार खाते न उघडताच बाद झाला. हार्दिकला ९ चेंडूत ९ धावा करता आल्या. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून १९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने ४३ धावा केल्या. कर्णधार एरोन फिंच फिंचने ३१ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने दोन बळी घेतले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसऱ्याच षटकात कॅमेरून ग्रीनच्या रूपाने पहिला धक्का बसला. ५ धावा करून तो धावबाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केले. पुढच्या षटकात टीम डेव्हिडही क्लीन बोल्ड झाला. मात्र, मॅथ्यू वेडने धोकादायक फलंदाजी करताना २० चेंडूत ४३ धावा केल्या.