Dainik Sahyadri

पुणे : वैद्यकीय निष्काळजीपणावर कठोर दखल; राममंगल हार्ट फाउंडेशन व डॉ. रणजीत जगताप दोषी ठरले

ramnagal heart foundation matter

ramnagal heart foundation matter

रुग्णांच्या हक्कांना बळ देणारा महत्त्वपूर्ण निर्णय देताना पुणे येथील अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने राममंगल हार्ट फाउंडेशन प्रा. लि. आणि नामांकित हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजीत जगताप यांना गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी ठरवले आहे.

आयोगाच्या निरीक्षणानुसार, अपेक्षित तीन तासांची बायपास शस्त्रक्रिया तब्बल अकरा तास चालली. त्यानंतर रुग्णाला गंभीर ब्रेन स्ट्रोक झाल्याचे स्पष्ट झाले. शस्त्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीबाबत रुग्ण किंवा नातेवाइकांना माहिती न देणे, आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध नसणे, उपचार प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव तसेच शस्त्रक्रियेपूर्वी संभाव्य धोके समजावून न सांगणे—या सर्व बाबी आयोगाने “सेवेत त्रुटी” ठरवल्या.

या प्रकरणात आयोगाने तक्रारदारांच्या बाजूने निर्णय देत १० लाख रुपये नुकसानभरपाई आणि २५ हजार रुपये खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय वैद्यकीय क्षेत्रातील उत्तरदायित्व आणि रुग्णांच्या माहितीच्या हक्कावर अधोरेखित करणारा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Exit mobile version