Dainik Sahyadri

Ajit Pawar Death Plane Crash News: अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू; महाराष्ट्र हादरला

Ajit Pawar Death Plane Crash News

Ajit Pawar Death Plane Crash News

अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार (Ajit Pawar Dead) यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती व्हायरल होत आहे. आज सकाळी बारामती परिसरात झालेल्या कथित विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा नियोजित असल्याची माहिती सांगितली जात आहे. या सभांसाठी ते सकाळीच मुंबईहून बारामतीकडे विमानाने रवाना झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाल्याचे व्हायरल पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या विमानात अजित पवारांसह अन्य पाच जण उपस्थित होते, असा दावा करण्यात येत आहे. (Ajit Pawar death news)


विमान अपघातानंतर हादरवणारी परिस्थिती – (Ajit Pawar Dead Plane Crash)

व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या दृश्यांमध्ये विमान पूर्णपणे जळून खाक झाल्याचे तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाल्याची माहितीही सोशल मीडियावर फिरत आहे.


अपघातग्रस्त विमान बोम्बार्डीयर कंपनीचे असल्याचा दावा – (Ajit Pawar died news)

व्हायरल माहितीनुसार, हे विमान बोम्बार्डीयर कंपनीचे लिअरजेट 45 प्रकारचे असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकारच्या विमानांचे याआधीही काही अपघात झाल्याचे संदर्भ सोशल मीडियावर दिले जात आहेत. मात्र या सर्व बाबींना अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शींचा दावा – (How did Ajit Pawar plane crash happen?)

सोशल मीडियावर काही प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींची विधानेही व्हायरल होत आहेत. त्यामध्ये विमान खाली येताना अनियंत्रित झाल्याचा आणि त्यानंतर मोठा स्फोट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या दाव्यांचीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.


विमानात कोण कोण होते? (व्हायरल माहितीनुसार)

Exit mobile version