दरवर्षी प्रमाणे यावर्षी चा दसरा मेळावा खास होता त्याची अंनेक कारणं आपल्याला सांगता येतील. पण मुख्य कारण म्हणजे यावर्षी फुटलेली शिवसेना हे आहे. शिवसेना फुटून एक वेगळा गट तयार होऊन त्यांनी भाजपा सोबत सरकार ही स्थापन केलं आहे. आपली ताकत दाखवण्याची हीच चांगली संधी आहे असं शिंदे गटाला वाटलं असावं आणि त्यामुळे त्यानीही या वर्षी दसरा मेळावा घेण्याचं ठरवलं आणि ठिकाणं ठरवलं “बीकेसी”. तिकडे उद्धव ठाकरे यनीही कोणतीही कसर सोडली नाही. जो मिळेल त्याला पक्षात प्रवेश देण्यावर त्यांचा भर होता जेणे करून आपल्याकडे एक ताकत उभी राहील आणि शिवतीर्थवर आपल्याला आपली ताकद दाखवता येईल आणि झालंही तसचं काहीनी चंगली भाषणेही केली. शिंदे हे सरकार मध्ये मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी या मेळाव्यासाठी आपल्या सरकारचा गर्दी जमवण्यासाठी चांगलाच वापर केलेल्या दिसून आला. अत्यंत कडक अशा सुरक्षेत ही दोन्ही मेळावे पार पडले आणि पोलिसानी दिलेल्या माहीती नुसार ठाकरे यांच्या मेळाव्याला लाख भर लोकांनी हजेरी लावली तर शिंदे यांच्या मेळाव्याला दोन लाखाच्या वर लोकानी भर घातली होती त्यामुळे गर्दीची तुलना करायची झाली तर शिंदे ही वरचढ ठरलेत.